Viral Video : उन्हाचा कहर! भुकेल्या जवानाने गरम वाळूवर भाजली अंडी; पाहा व्हायरल VIDEO

Jawan Boils Egg in Sand : उन्हामुळे तापलेल्या वाळूचा थेट जेवण बनवण्यासाठी उपयोग केला आहे. वाळूमध्ये एक खड्डा करून त्यांनी यामध्ये अंडी ठेवली आहेत. काही वेळातच ही अंडी भाजून आतून शिजली आहे.
Jawan Boils Egg in Sand
Viral VideoSaam TV

राज्यासह देशभरात उन्हाचा कहर झाला आहे. सर्वत्र उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत देखील उष्णतेने नागरिक हैराण झालेत. या परिस्थितीत वाळवंटातील तापमान किती असेल आणि तेथील नागरिक कसे जगत असतील असा प्रश्न पडतो. इतका कडक उन्हाळा असला तरी या परिस्थितीत आपले भारतीय जवान वाळवंटातील सीमेवर तैनात राहतात. अशाच एका जवानांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Jawan Boils Egg in Sand
Dombivli MIDC Fire : भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली! आसपासच्या कंपन्या आगीच्या भक्ष्यस्थानी; शोरूममधील १० - १२ नव्या कोऱ्या कार जळून खाक|VIDEO

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, राजस्थानच्या बिकानेरमधील भारत-पाकिस्तान बॉर्डरवर काही जवान तैनात आहेत. येथे उष्णतेचा पारा ४८.८ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. मात्र तरीही जवान आहे त्या परिस्थितीत तेथे पहारा देत आहेत. अशा वातावरणात जेवण तरी कसे बनवावे आणि पोट कसे भरावे असा प्रश्न येथील एका जवानांना पडला.

त्यामुळे त्यांनी येथील उन्हामुळे तापलेल्या वाळूचा थेट जेवण बनवण्यासाठी उपयोग केला आहे. वाळूमध्ये एक खड्डा करून त्यांनी यामध्ये अंडी ठेवली आहेत. काही वेळातच ही अंडी भाजून आतून शिजली आहे. त्यानंतर बॉर्डरवरील या जवानांनी ही अंडी खाल्ली आहेत. कोणत्याही कठीण परिस्थितीत तेथे जिवंत राहायचे आणि शत्रूला दोन हात कसे करायचे हे यातून समजतं.

तळपत्या उन्हात जिवाची पार लाहीलाही होते. त्यामुळे यातून दूर जाण्यासाठी एसी, कुलर, पाणी अशा विविध गोष्टी आपण शोधत असतो. मात्र सीमेवर कर्तव्यावर तैनात असलेले जवान अशा परिस्थितीचा देखील उपयोग कसा करता येईल याचा विचार करत असतात. जवानांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पीटीआयने हा व्हिडिओ पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

सीमेवरील तापमान कधी ४६ तर ४७ पर्यंत पोहचतं. अशा वातावरणात जीवंत राहणं कठीण आहे. असे असताना जवानांना देखील उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे ड्यूटीवर येण्याआधी आणि ड्यूटी संपल्यावर त्यांना लिंबू पाणी, जलजीरा पाणी, ओआरएस असे थंड पाणी पिण्यासाठी दिले जाते.

Jawan Boils Egg in Sand
Shivani Agrawal Video : कार अपघातातील मुलाच्या व्हायरल व्हिडिओनंतर आईनं केला VIDEO; मोठा खुलासा करत कॅमेऱ्यासमोर ढसाढसा रडली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com