Bicycle To Chandrayaan-3 Journey: सायकलपासून चंद्रापर्यंतचा प्रवास; व्हायरल फोटोमागचा इतिहास काय?

Cycle Se Chand Tak History: पहिलं रॉकेट सायकलवरुन वाहून नेलं; आज चंद्रावर यशस्वीरीत्या चांद्रयान -३ उतरलं, सायकलपासून चंद्रापर्यंत PHOTO VIRAL
Bicycle To Chandrayaan-3  Journey
Bicycle To Chandrayaan-3 JourneySaam TV
Published On

Chandrayaan-3 Landed Successfully:

चांद्रयान -३ यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलं आहे. या ऐतिहासिक क्षणामुळे संपूर्ण भारतात उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. १४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून ‘चांद्रयान ३’ हे चंद्राच्या दिशेने झेपावलं. शास्त्रज्ज्ञ, तंत्रज्ज्ञ, संशोधकांची जिद्द मार्गी लागल्याने सर्वत्र आनंदमय वातावरण तयार झालं आहे. अशात सध्या सोशल मीडियावर चांद्रयान- ३ मोहीमेचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतायत. (Latest Bicycle To Chandrayaan-3 Viral Photo)

व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये उजव्या बाजूला चांद्रयान - ३ आकाशात झेपावलेलं दिसत आहे. तर दुसरीकडे एक व्यक्ती सायकलवर रॉकेट घेऊन जात आहे. त्या व्यक्तीसोबत आणखीन एकजण चालताना दिसत आहे. तसेच या फोटोवर सायकलपासून चंद्रापर्यंत असं कॅप्शन लिहिण्यात आलं आहे.

Bicycle To Chandrayaan-3  Journey
Beed News : Chandrayaan 3 च्या यशस्वी मोहिमेनंतर बीडमध्ये आनंदाला उधाण! आर्ष्टीत 101 तोफांची सलामी

VIRAL फोटोमगील इतिहास काय?

व्हायरल होत असलेल्या या फोटोमागे मोठा इतिहास आहे. काही माध्यमांवर दिलेल्या माहितीनुसार, इस्रोची सुरुवात फार पूर्वी म्हणजेच १९६२ मध्ये झाली होती. त्यावेळी त्याला भारतीय अंतराळ संशोधन समिती (INCOSPAR) असं म्हटलं जायचं. नंतर पुढे INCOSPAR १५ ऑगस्ट १०६९ रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) बनली.

विक्रम साराभाई यांच्या INCOSPAR या संस्थेला ISRO म्हणून ओळखलं जातं. १९६२ च्या काळात भारताने पहिलं रॉकेट प्रक्षेपित केलं होतं. त्यावेळी सायकलवरुन त्याचे काही भाग प्रक्षेपण केंद्रापर्यंत पोहचवण्यात आले होते. तेव्हा हा ऐतिहासीक फोटो क्लिक करण्यात आला होता. आता हाच फोटो व्हायरल होत असून भारतीय नागरिक आपल्या स्टेटसवर आणि स्टोरीवर ठेवत आहेत.

Bicycle To Chandrayaan-3  Journey
S Somanath On Chandrayaan 3: आता लक्ष पुढील 14 दिवसांवर, नेमकं काय होणार; इस्रो प्रमुख म्हणाले...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com