Fact-Check: अयोध्येत हनुमान अवतरले, भगवान हनुमान दिसताच भक्तांचा जयघोष? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Hanuman In Ayodhya Fact-Check: अयोध्येत हनुमान दिसले. होय, हनुमान हवेत उडतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात हा दावा करण्यात आलाय. पण, खरंच या व्हिडिओत दिसतंय त्यात तथ्य आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Hanuman In Ayodhya Fact-Check:
Viral video claiming Hanuman appeared in Ayodhya fact-checked; truth behind the clip revealed.saam tv
Published On
Summary
  • अयोध्येत हनुमान उडताना दिसला?

  • व्हायरल व्हिडिओ एआय निर्मित

  • भक्तांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

अयोध्येत हनुमानजींचे दर्शन झाले असा दावा करणारा हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. यामध्ये बजरंगबली हनुमान आधी चालत येतात आणि अचानक गदा घेऊन हवेत उडताना दिसतंय.काही लोक जय श्रीराम, जय बजरंगबली अशा घोषणा देत असल्याचा आवाज येतोय. त्यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ व्हायरल करून दर्शन घेतलंय. पण, खरंच व्हिडिओत दिसतंय ते तथ्य आहे का?

हा व्हिडिओ संतोष निषाद काख नावाच्या फेसबुक युजरने शेअर केलाय. व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, काल रात्री अयोध्येत हनुमानजींचे दर्शन झालं असा दावा केलाय. या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आलंय. काहींनी तर हा व्हिडिओ खरा असल्याचं म्हटलंय. तर काहींनी असं घडलंच नसल्याचं म्हटलंय. सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा होतेय.

Hanuman In Ayodhya Fact-Check:
Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

हा भक्तांच्या श्रद्धेचा विषय असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली. हनुमान रामायण काळात होऊन गेले असा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. भगवान श्री रामाचे परम भक्त आणि त्यांचे महत्त्वाचे सहकारी होते. असंही लिहिलंय. मात्र, आता हनुमान प्रत्यक्षात दिसले का? याची आम्ही सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

Hanuman In Ayodhya Fact-Check:
आता पक्षासारखं हवेत उडा? पंख लावून माणसाला हवेत उडता येणार?

साम इन्व्हिस्टिगेशन

अयोध्येत बजरंगबली हनुमान उडताना दिसलेले नाही

व्हायरल व्हिडिओ एआय निर्मित

भक्तांची दिशाभूल करण्यासाठी व्हिडिओ व्हायरल

एआय वापरून तयार करण्यात आल्याचं आढळून आलं. त्यामुळे आमच्या पडताळणीत अयोध्येत हनुमान दिसल्याचा दावा असत्य ठरलाय. असा व्हिडिओ तुम्हाला आला तर यावर विश्वास ठेवू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com