Shocking: हवेत चालणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? VIDEO पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Air Walking Video: सोशल मीडियावर हवेत चालणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्यक्तीचे टॅलेंट पाहून नेटकरी त्याचे कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. व्हिडीओ एकदा बघाच....
Shocking: हवेत चालणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? VIDEO पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Viral Video Saam Tv
Published On

सोशल मीडिया हे असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कोणताही फोटो असो वा व्हिडीओ तो अवघ्या काही सेकंदात व्हायरल होतो. काही व्हिडीओ इमोशनल, काही व्हिडीओ हसवणारे तर काही व्हिडीओ कुणाचे तरी टॅलेंट दाखवणारे असतात. असाच एक टॅलेंटेड तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

तुम्ही आतापर्यंत कधी हवेत चालणारा माणूस पाहिला नसेल. सध्या व्हायरल होणारा या तरुणाचा व्हिडीओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण हा तरुण चक्क हवेत चालताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाचे नेटकरी खूप कौतुक करताना दिसत आहेत.

'एअर वॉक' नावाने या तरुणाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक काळ्या रंगाचा टीशर्ट आणि ग्रे कलरची पँट घातलेला तरूण उभा आहे. या तरुणाच्या अवती भोवती मोठी गर्दी झाली आहे. एखाद्या सर्कसमधील खेळ सुरू असल्यासारखे दिसत आहे.

Shocking: हवेत चालणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? VIDEO पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Viral : अजबच! खड्ड्यानं जीवात जीव आणला, अ‍ॅम्ब्युलन्स खड्ड्यात आदळली; मृत माणूस उठून बसला, डॉक्टरही चक्रावले

या तरुणाचे टॅलेंट पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली आहे. त्यानंतर एक दोन तीन म्हणताच हा तरूण गर्दीच्या मधोमध हवेत चालताना दिसत आहे. या तरुणाचे हे टॅलेंट पाहून उपस्थित सर्वजण टाळ्या वाजवतात. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये या तरुणाचे टॅलेंट व्हिडीओच्या माध्यमातून शूट करतात. काहींनी तर त्याचे कौतुक देखील केले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.

Shocking: हवेत चालणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? VIDEO पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Husband Wife Dispute : बायको लॉजमध्ये बॉयफ्रेंडसोबत बेडवर, अचानक नवऱ्याची एन्ट्री; घाबरून बाईनं १२ फूट उंचावरून खाली उडी मारली, Video Viral

या व्हिडीओवर कमेंट करत एका नेटकऱ्यांनी असे लिहिले की, 'याचा अर्थ जर माणसाने रोज सराव केला तर तो आकाशात उडू शकतो.' दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की,'जबरदस्त टॅलेंट आहे. अशीच मेहनत करत राहा.' तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, 'हे एखाद्या शेतकऱ्याचा मुलगाच करू शकतो.' तर आणखी काही नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये 'खतरनाक, एक नंबर.', अशा कमेंट्स केल्या आहेत.

Shocking: हवेत चालणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? VIDEO पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Viral News: ओरफिश दिसला, देशावर मोठं संकट येणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com