मुंबई ते आसाम रस्त्यावर धावलं एअर इंडियाचे विमान; VIDEO व्हायरल

Viral Video: एअर इंडियाच्या एका विमानाने चक्क जिमिनीवरुन प्रवास केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे.
Air India Aeroplane
Air India AeroplaneSaam Tv
Published On

Air India Aeroplane Viral Video:

विमानाचा प्रवास म्हटल्यावर अनेकांना भीती वाटते. अनेकांना तर आकाशात उडतानाचे विमान पाहूनदेखील पोटात गोळा येतो. विमानाचा हा प्रवास काही लोकांना आवडतो. तर काही लोकांना भीतीदायक वाटतो. परंतु तुम्ही कधी बाय रोड विमानाचा प्रवास केला आहे का? विमान जमिनीवरुन जाताना पाहिलाय का? मात्र, एअर इंडियाच्या एका विमानाने चक्क जिमिनीवरुन प्रवास केला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल होत आहे. (Viral News In Marathi)

एअर इंडियाचे (Air India)एक विमान मूंबईहून थेट आसामला रोडने प्रवास करत गेले आहे. हे विमान तर जमिनीवरुन जात आहे. मात्र, याचा त्रास रस्त्यावरील वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. एएनआयने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

विमान जमिनीवरुन जाताना दिसत आहे. भंगारात काढलेलं हे विमान रस्त्यावरुन आसामला नेण्यात आलं आहे. मूंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाहून (Mumbai International Airport) हे आसामच्या दिशेने जात होते. मात्र, विमानाला जमिनिवर प्रवास करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे विमान बिहारच्या मोतीहारी भागात एका पूलखाली अडकल्याचे दिसत आहे.

Air India Aeroplane
Viral Video: ग्राहकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी स्विगीची अनोखी शक्कल, बँड-बाजासोबत गाठलं ग्राहकाचं घर

एअर इंडियाचे हे विमान पूलाखाली अडकल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे. तसेच विमानालादेखील पूलाखालून बाहेर काढण्यात लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Air India Aeroplane
Goa Viral Video: पालकांचा निष्काळजीपणा! चालू गाडीच्या छतावर चिमुकल्यांची झोप; धक्कादायक VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com