Viral News : संतापजनक! कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, Video व्हायरल

Ahemdabad News : अहमदाबादमध्ये एका व्यक्तीने कुत्र्याला मारहाण करून दुचाकीला बांधून ओढत फिरवल्याची घटना समोर आली आहे. सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Viral News : संतापजनक! कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, VIODE व्हायरल
Viral videoSaam tv
Published On
Summary
  • अहमदाबादमध्ये कुत्र्याला दुचाकीला बांधून ओढत नेणारा आरोपी अटकेत.

  • सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

  • आरोपीवर BNS व प्राणीक्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल.

  • प्राणीप्रेमींकडून कठोर शिक्षेची मागणी व प्राणीसंवेदनशीलतेची गरज अधोरेखित.

अहमदाबादमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. रमेश पटेल नावाच्या व्यक्तीने अमानुषपणे एका निरपराध कुत्र्याला प्रथम मारहाण केली आणि त्यानंतर आपल्या मोटारसायकलच्या मागे बांधून रस्त्यावर ओढत फिरवले. या भयानक घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्राणीप्रेमींनी या कृतीचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले की, पटेलने आपल्या दुचाकीच्या मागे त्या कुत्र्याला बांधले होते आणि तो रस्त्यावरून बराच काळ ओढला गेला. तो प्राणी वेदनेने तडफडत असूनही असहाय्य अवस्थेत रस्त्यावर घसरत होता. आधीच मारहाण झालेल्या त्या कुत्र्याची अवस्था अधिकच बिकट झाली. या घटनेनंतर आरोपीने गंभीर जखमी झालेल्या कुत्र्याला एका पुलाखालून सोडून दिल्याचे समोर आले आहे. सध्या त्या कुत्र्याची नेमकी तब्येत काय आहे, तो जिवंत आहे की नाही, याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Viral News : संतापजनक! कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, VIODE व्हायरल
Viral Video: बाईई काय हा प्रकार! लॅपटॉपवर बनवल्या पुऱ्या, महिलेचा जुगाड पाहून तुम्हीही थक्क व्हाल

या प्रकारामुळे प्राण्यांवरील क्रूरतेबाबत पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) तरतुदींसह प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून, न्यायालयीन कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर या घटनेबाबत लोकांचा संताप व्यक्त होत आहे. अनेकांनी ही कृती "मानवतेला काळिमा फासणारी" असल्याचे म्हटले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांना कायमस्वरूपी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले होते. मात्र मोठ्या खंडपीठाने हा आदेश बदलून, कुत्र्यांची नसबंदी करून त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडण्याची मुभा दिली.

Viral News : संतापजनक! कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, VIODE व्हायरल
Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

अहमदाबादमधील या घटनेमुळे समाजात एक धोकादायक वास्तवही समोर आले आहे, भटक्या प्राण्यांच्या समस्येचा सामना करताना काही लोक अमानुष मार्ग निवडतात. मात्र कायद्याच्या दृष्टीने हे गुन्हेगारी कृत्य असून, समाजाला चुकीचा संदेश देणारे आहे. प्राणी हे समाजाचाच एक भाग आहेत आणि त्यांच्यावरील क्रूरता थांबवण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नाहीत, तर सामाजिक जागरूकताही तितकीच आवश्यक आहे.

Viral News : संतापजनक! कुत्र्याला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, VIODE व्हायरल
Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

ही घटना लोकांना विचार करायला लावणारी आहे. आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे आरोपी अटकेत आला, परंतु अशा अनेक घटना गावोगावी, शहरांमध्ये घडत असतात ज्या प्रकाशझोतात येत नाहीत. प्राण्यांवरील अमानुष वागणूक थांबवण्यासाठी कठोर शिक्षा, कडक कायद्याची अंमलबजावणी आणि समाजात प्राणीप्रेमाची भावना जागृत करणे ही काळाची गरज असल्याचे प्राणीप्रेमींचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com