Snake Viral Video: बापरे बाप! शायनींग मारण्यासाठी सापची पप्पी घेतली; खवळलेल्या सापाने तरुणाच्या ओठांचा घेतला चावा, VIDEO व्हायरल

Man Kissing Snake: एका व्यक्तीने चक्क सापासमोर जाण्याचे धाडस केले.
Snake Viral Video
Snake Viral VideoSaam TV
Published On

Snake Attack Man:

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ हा मनोरंजनाचा विषय असला तरी काही व्हिडीओ पाहून धडकीच भरते. असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती सापाच्या जवळ जातो आणि काय होत ते तुम्ही व्हिडीओत पाहाच.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

व्हायरल होत असलेल्या या सापाचा व्हिडीओ खूपच भयंकर आहे. रस्त्यात फणा काढून एक साफ बसला होता. तर एका व्यक्तीने त्याच्या समोर जाण्याचे धाडस केले. इतकेच नाहीत तर माणसाने त्याला सापाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओतील हा माणूस या सापाला हाताने स्पर्श करत नव्हता. त्याने त्यात सापाला किस करण्याचा प्रत्यन केला.

सापाच्या इतक्या जवळ गेल्यावर तो थोडी गप्प बसणार. सापाने त्या व्यक्तीवर हल्ला केला. किस करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडावरच सापाने दंश केला. त्या माणसाने सापाला स्वतःपासून दूर केलं. या कृत्याने तो व्यक्ती गंभीर जखमी झाला असून तो दगावला आहे की नाही हे अद्याप कळू शकलेले नाही. (Viral Video)

Snake Viral Video
Husband Killed Wife and Mother in Law : दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर हादरलं! पतीने पत्नी आणि सासूला क्रूरपणे संपवले

या व्हायरल व्हिडीओमधील माणसाचा कृत्य खूप भयानक होत. कोणत्याही प्राणांच्याजवळ केल्यावर ते त्यांच्या सुरक्षेसाठी हल्ला करतातच. या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत आहेत. तसेच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तरी असे करण्याचे धाडस करून नका, असे आवाहन नेटकरी करत आहेत.

सापाला किस करतानाचे अनेक व्हिडीओ याआधी देखील व्हायरल झाले आहेत. काही व्हिडीओमध्ये तर सापाने किस करणाऱ्या व्यक्तीवर हल्ला देखील केला आहे. या व्यक्तींना यामुळे दुखापत झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com