तुम्हाला कळणार मृत्यूची तारीख? तुमचा मृत्यू कधी होणार? एक टेस्ट सांगणार तुमचा शेवटचा दिवस?

लोक म्हणतात की मृत्यू कुणालाही चुकलेला नाही...मात्र आता ही गोष्ट जुनी झालीय. आता तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता असेल हे तुम्ही स्वतः जाणून घ्याल.. होय हे अगदी खरं आहे...
 Death Test
Death TestSaamTV
Published On

ज्याचा जन्म होतो त्याचा शेवट होतो, कारण जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. मात्र मृत्यू कधी, कसा आणि केव्हा येईल हे कुणीच सांगू शकत नाही. आता हेच सांगणारं तंत्रज्ञान विकसीत केल्याचा दावा एका कंपनीनं केलाय. या कंपनीच्या म्हणण्यानुसार तुम्हाला तुमच्या मृत्यूची तारीख कळू शकेल? नेमकं कसं आहे हे तंत्रज्ञान, पाहूयात हा रिपोर्ट...

लोक म्हणतात की मृत्यू कुणालाही चुकलेला नाही...मात्र आता ही गोष्ट जुनी झालीय. आता तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता असेल हे तुम्ही स्वतः जाणून घ्याल.. होय हे अगदी खरं आहे...मृत्यूची तारीख सांगणारा दावा एका कंपनीनं केलाय. या कंपनीचं नाव एलिसियम हेल्थ असं आहे. बायोलॉजिकल टेस्टद्वारे तुम्हाला तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस कोणता असेल हे कळू शकेल असं या कंपनीचं म्हणणं आहे. या कंपनीनं नेमका काय दावा केलाय पाहूयात..

 Death Test
Maharashtra Politics : कोकणात ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिंदे गटात मोठ्या नेत्यांची एन्ट्री होणार? शिवसेनेच्या बड्या नेत्याचा दावा

तुम्हाला कळणार मृत्यूची तारीख?

मृत्यूची तारीख जाणून घेण्यासाठी माणसांवर बायोलॉजिकल टेस्ट केली जाते. यात त्या व्यक्तीच्या लाळेचं सॅम्पल घेतलं जातं. लाळेच्या सॅम्पलची DNA चाचणी केली जाते. या DNA टेस्टमध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मिथिलेशन पॅटर्नची तपासणी केली जाते. या चाचणीतून जो निकाल समोर येतो त्याला एपीजेनिटक घड्याळ मानलं जातं. एपीजेनिटिक घड्याळ याचाच अर्थ त्या व्यक्तीकडे जगण्यासाठी आता किती अवधी उरलाय... एलिसियम हेल्थ नावाच्या कंपनीनं हे तंत्रज्ञान विकसीत केलंय. या टेस्टसाठी जवळपास 44 हजार रूपये खर्च अपेक्षित आहे.

आता आपल्याला हाही प्रश्न पडला असेल की मृत्यूची तारीख जाणून घेऊन काय करणार? अनेकजण आपल्या कुटुंबाला वेळ देतील. तर काहीजण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेळेचं नियोजन करतील. त्यामुळे तुम्हीही 44 हजार रूपयांत तुमच्या मृत्यूची तारीख जाणून घेऊ शकता. अर्थात कंपनीमार्फत प्रत्यक्ष ही सेवा कधी सुरू होईल याची माहिती देण्यात आलेली नाही. तसच असं तंत्रज्ञान खरंच विकसीत झालंय का? याबाबतही तज्ज्ञांकडून स्पष्टता मिळालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हे तंत्रज्ञान केवळ कागदावरच आहे असं म्हणायला हरकत नाही.

 Death Test
Mumbai Mega Block : मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक, कुठे आणि कधी? प्रवास करण्याआधी वाचा वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com