
मुंबई : इडली ही पौष्टिक असते. त्यामुळे अनेकजण नाष्ट्याला आवडीने इडली खातात. मात्र तुम्हीही इडली आवडीने खाताय तर सावधान. तुम्ही खात असलेल्या इडलीत प्लास्टिक असू शकतं. कारण अनेक हॉटेल्समध्ये प्लास्टिक इडली आढळून आल्यात. अशा इडल्यांमुळे कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका निर्माण होऊ शकतो. इडली बनवण्यासाठी काही हॉटेलमध्ये प्लास्टिक आणि पॅलिथीन शीटचा वापर केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लोकांच्या जीवाशी खेळण्याच्या या कारनाम्याची माहिती मिळताच आरोग्य विभागाने छापा टाकून ह्या इडल्या जप्त केल्या. त्यावेळी इडली बनवण्यासाठी प्लास्टिक वापरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
तुमच्या इडलीत प्लास्टिक?
इडली बनवण्यासाठी सुती कपड्याऐवजी प्लास्टिकचा वापर
वाफेमुळे प्लास्टिक वितळून विषारी कण इडलीत मिसळतात
प्लास्टिक मिसळलेली इडली खाल्ल्याने पोटाचे विकार वाढतात
यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजारही होऊ शकतो
हे सगळं घडलंय कर्नाटकात. २५० हॉटेलमधून इडली तपासण्यात आल्या. त्यामध्ये ५२ सॅम्पलमध्ये प्लास्टिक आढळून आलं. ही धक्कादायक माहिती समोर येताच कर्नाटकातील आरोग्यमंत्र्यांनी तातडीने ५२ हॉटेलवर कारवाई करत प्लास्टिक वापरण्यास बंदी घातली. त्यानंतर कठोर कारवाईचे आदेश दिले. तसंच हा प्रकार किती दिवस सुरू होता, याचाही तपास केला जातोय.
शेजारील राज्यात घडलेल्या प्रकरानंतर महाराष्ट्रही अर्लट झालाय. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनान आपल्या राज्यातही असं प्रकार होतं नाहीत ना याची खात्री करणं गरजेचं आहे. कारण प्रश्न आरोग्याचा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.