
तुम्ही कुकरमध्ये शिजवलेलं अन्न खाता का...? कारण, तुमच्या कुकरमुळे तुम्हाला कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो...असा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय...त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
हा दावा ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल...कारण, बऱ्याच गृहिणी जेवण करण्यासाठी प्रेशर कूकरचा वापर करतात...त्यामुळे खरंच हे सत्य आहे का...? कूकरचा रबर इतका घातक असतो का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...
भात शिजवायचा तर कूकर...चिकन शिजवायचं तर कुकर...डाळ, शोले, वाटाणे शिजवायचे झाले तर कूकर...अनेक पदार्थ बनवण्यासाठी कूकरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय...आणि व्हायरल व्हिडिओत दावा केलाय की कूकरचा रबर हळूहळू वितळतो आणि अन्नात त्याचे कण जातात...यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो...मात्र, खरंच कुकरमुळे कॅन्सरचा धोका निर्माण होतो का...? याची सत्यता जाणून घेणं गरजेचंय...हा आरोग्याचा प्रश्न आहे...घरी बनवलेलं जेवण सगळेच जण खात असतात...त्यामुळे कूकरचं जेवण खाल्ल्याने कॅन्सर होऊ शकतो का...? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने तज्ज्ञांचा सल्ला घेतला...
त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...
सगळेच कूकर आरोग्यासाठी हानिकारक नाही
कूकरचा रबर खराब झाल्यास चांगल्या क्वॉलिटीचा वापरा
कूकरला फूड ग्रेड रबर असायला हवा
हलक्या क्वॉलिटीचा रबर लावल्यास तो विरघळतो
त्यामुळे तुम्ही कूकर वापरताना चांगल्या क्वॉलिटीचा वापरा आणि रबर खराब झाल्यास फूड ग्रेड रबर लावा...असे दावे लोकांना घाबरवण्यासाठी केले जातात...मात्र, आमच्या पडताळणीत प्रेशर कुकरमुळे कॅन्सरचा धोका वाढतो हा दावा असत्य ठरलाय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.