Special Report: मेलेली व्यक्ती पुन्हा होऊ शकते जिवंत? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? - VIDEO

Dead Person Alive Technology: मेलेल्या व्यक्तीला आता पुन्हा जिवंत करता येणं शक्य आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल, काय आहे यामागचं सत्य जाणून घ्या.
 Special Report: मेलेली व्यक्ती पुन्हा होऊ शकते जिवंत? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?- VIDEO
special reportsaam tv
Published On

>>योगेश पाटील

आता बातमी आहे एका खळबळजनक दाव्याची. मेलेल्या व्यक्तीला आता पुन्हा जिवंत करता येणं शक्य आहे. हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल.कारण माणूस एकदा मेला की पुन्हा जिवंत झालेलं आजतागायत कुठे ऐकलेलं नाही. मात्र, आता मेलेल्याला जिवंत करणं शक्य असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासह हे कसं शक्य आहे तेदेखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळे हा दावा खरा आहे का याचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं. मग काय सत्य समोर आलं?पाहा.

माणूस पुन्हा जिवंत होणार हे ऐकून तुम्हाला विश्वास बसला नसेल. मात्र, हा चमत्कार घडू शकतो. विज्ञानाच्या युगात पुन्हा माणूस जिवंत करणं शक्य असल्याचा दावा एका संस्थेनं केला आहे आणि हे कसं शक्य आहे ते देखील दाखवण्यात आलंय. या व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुया.

गेल्या काही दशकांमध्ये विज्ञानाची प्रगती झपाट्याने झाली आहे. खरंच मृत व्यक्तीला जिवंत करणं शक्य आहे का हे जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने इन्व्हेस्टिगेशन केलं... त्यामुळे काय सत्य समोर आलं पाहुया.

 Special Report: मेलेली व्यक्ती पुन्हा होऊ शकते जिवंत? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?- VIDEO
Viral Video: आजोबा जोमात वऱ्हाडी कोमात, काठी न घोंगड गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पाहा VIDEO

अमेरिकेच्या अल्कोर लाइफ एक्स्टेंशन फाउंडेशनने हा दावा केला आहे. व्यक्तीला जिवंत करण्यासाठी क्रायोप्रिझर्वेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो या तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्ण शरीर, मेंदू जपला जातो. क्रायोप्रिझर्वेशनमध्ये शरीर सडण्यापासून रोखण्यास मदत होते.सर्व जैविक क्रिया थांबतात. यानंतर, शरीराचे विट्रिफिकेशन केले जाते.ज्यामध्ये शरीरात असलेल्या रक्ताच्या जागी एक विशेष प्रकारचे सोल्युशन सोडले जाते. मृत व्यक्तीच्या शरीरात बर्फाचे स्फटिक तयार होण्यापासून रोखण्यासाठी हे केले जाते. विट्रिफिकेशननंतर मृतदेहाला - (मायनस) 196 अंश तापमानात नेले जाते. हे तंत्रज्ञान सध्या अमेरिकत आहे.भारतात यावर संशोधन सुरू आहे.मात्र, माणसाला कसं काय जिवंत करता येतं.याबाबत आमच्या टीमने इन्व्हेस्टिगेशन केलं. यासाठी आम्ही डॉक्टरांना भेटलो तेव्हा काय समोर आलं पाहूया

 Special Report: मेलेली व्यक्ती पुन्हा होऊ शकते जिवंत? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?- VIDEO
चायsss... वारकऱ्यांसाठी गरमागरम चहा; रावसाहेब दानवे चहावाल्याच्या भूमिकेत, पाहा Video

औरंगबादचे डॉ. शोएब हाश्मी आणि पुण्याचे डॉ. कल्याण गंगवाल यांच्या दाव्यानूसार ,आतापर्यंत अशा पद्धतीने एकही मृतदेह पुन्हा जिवंत करण्यात आलेला नाही.

मात्र माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या शरीरातील काही अवयव काही तास जिवंत ठेवता येतात. या प्रयोगात पूर्ण शरीर प्रिझर्व करून ठेवलं जातं. मात्र हा प्रयोग

यशस्वी होईल याची कुठलीही हमी नाही. मात्र आताच्या वैद्यकीयशास्त्राचा विचार केल्यास या प्रयोगाला यश येणं कठीण आहे. त्यामुळे मृत माणूस जिवंत होणार हा दावा असत्य वाटतो. माणूस जिवंत होईल की नाही हे सांगता येत नाही.काहींना जगण्याची इच्छा असते त्यामुळे असे प्रयोग केले जात आहेत. भारतात मात्र असा प्रयोग सुरू नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com