Presidental Attacks in America: अमेरिकेच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास! अब्राहम लिंकन ते जेम्स गारफिल्ड; आतापर्यंत 'या' राष्ट्राध्यक्षांच्या झाल्यात हत्या

Firing On Donald Trump: अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. आधीही अमेरिकेच्या ४ राष्ट्राध्यक्षांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वाचा अमेरिकेच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास.
Presidental Attacks in America: अमेरिकेच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास! अब्राहम लिंकन ते जेम्स गारफिल्ड; आतापर्यंत 'या' राष्ट्राध्यक्षांच्या झाल्यात हत्या
Firing On Donald Trump:Saamtv
Published On

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला. पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित रॅलीला संबोधित एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात डोनाल्ड ट्रम्प हे थोडक्यात बचावले. या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ला होण्याची ही पहिली वेळ नाही. आधीही अमेरिकेच्या ४ राष्ट्राध्यक्षांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. वाचा अमेरिकेच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास.

Presidental Attacks in America: अमेरिकेच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास! अब्राहम लिंकन ते जेम्स गारफिल्ड; आतापर्यंत 'या' राष्ट्राध्यक्षांच्या झाल्यात हत्या
Political News: छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला; प्रवीण दरेकरांची मोठी प्रतिक्रिया...

अब्राहम लिंकन (१८६५)

अब्राहम लिंकन हे हत्या झालेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. १४ एप्रिल १८६५ रोजी गुड फ्रायडे, १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांची हत्या झाले. अब्राहम लिंकन हे वॉशिंग्टन डीसीमधील फोर्डच्या थिएटरमध्ये अवर अमेरिकन कजिन हे नाटक पाहण्यासाठी बसले होते. यावेळी जॉन विल्क्स बूथ याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर बूथ घटनास्थळावरून पळून गेला, काही आठवड्यांनंतर त्याला व्हर्जिनियामध्ये पकडण्यात आले आणि गोळ्या घालण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर 12 तासांत लिंकन यांचा मृत्यू झाला.

जेम्स गारफिल्ड (१८८१)

यानंतर दुसरी घटना अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यासोबत घडली. जुलै १८८१ मध्ये जेम्स गारफिल्ड वॉशिंग्टन डी.सी. रेल्वे स्टेशनवर असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. चार्ल्स गिटो या तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर गारफिल्ड यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना यश आले नाही. चार्ल्स गिटो हा मानसिक आजाराने ग्रस्त होता आणि गारफिल्ड यांच्या प्रशासनात नोकरी न मिळाल्याचा त्याला राग होता. याप्रकरणी त्याला दोषी ठरवून वर्षभरातच फाशी देण्यात आली.

Presidental Attacks in America: अमेरिकेच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास! अब्राहम लिंकन ते जेम्स गारफिल्ड; आतापर्यंत 'या' राष्ट्राध्यक्षांच्या झाल्यात हत्या
Wardha Crime : शेजाऱ्याच्या घरी जाणे पडले महागात; चोरट्याने डाव साधत रोख रक्कमेसह दागिने लंपास

विल्यम मॅककिन्ले (१९०१)

अमेरिकेचे २५ वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ले त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण करत असताना ६ सप्टेंबर १९०१ रोजी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यादिवशी विल्यम मॅककिन्ले हे न्यूयॉर्कमधील पॅन-अमेरिकन प्रदर्शनाला उपस्थित होते. याच कार्यक्रमात त्यांच्या पोटात दोनदा गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यानंतर त्यांचा आठ दिवसांनी मृत्यू झाला.

जॉन एफ. केनेडी (१९६३)

२२ नोव्हेंबर १९६३ रोजी अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची पत्नी आणि फर्स्ट लेडी जॅकलीन केनेडी यांच्यासोबत टेक्सासमध्ये मोकळ्या कारमधून जात असताना त्यांच्या डोक्यात गोळी लागली होती. निवडणूक प्रचाराची घोषणा करण्याच्या ते तयारीत होते याचवेळी त्यांच्यावर हल्ला झाला. हार्वे ओसवाल्ड याला गोळीबारासाठी अटक करण्यात आली होती. त्याने वैयक्तिक कारणास्तव गोळीबार केल्याचे समोर आले होते.

Presidental Attacks in America: अमेरिकेच्या राजकारणाचा रक्तरंजित इतिहास! अब्राहम लिंकन ते जेम्स गारफिल्ड; आतापर्यंत 'या' राष्ट्राध्यक्षांच्या झाल्यात हत्या
Viral Video : बापरे! घरात सापडली तब्बल १०० नागाची पिल्लं; काळजात धस्स करणारा VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com