Kalyan News: कल्याणमध्ये नशेखोरांचा माज! भररस्त्यात गांजा ओढतानाचा व्हिडिओ व्हायरल

Youth Smoking Ganja On Busy Road: कल्याणच्या पश्चिम भागात भररस्त्यात गांजा ओढणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेने स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून पोलिसांकडून कारवाईची मागणी होत आहे.

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणच्या पश्चिमेला काही नशेखोर खुलेआम गांजाचा दम मारतानाचा व्हायरल व्हिडिओ मोठा चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडिओ इंदिरानगर भागातील असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओ गांजा मारत मुजोरी करताना दिसत आहेत. आणि इतर आपल्या इतर साथीदाराना काढ व्हिडिओ असे सांगत आहे यावरून असे दिसत आहे की, या नशेखोरांना कसलाही कायद्याचा धाक उरलेला नाही. महत्वाची बाब म्हणजे हा व्हिडिओ ज्या भागातील आहे. त्या भागाच्या जवळ कल्याणातील नामांकित बिर्ला महाविद्यालय आहे, आणि अशा प्रकारे जर नशेखोर या भागात वावरत असतील तर या नशेच्या व्यसनाची आग लवकरच शहरातील इतर भागात पसरायला वेळ लागणार नाही. आता या संतापजनक प्रकारावर कल्याण पोलिस काय कारवाई करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com