पुणे येथील सिंहगड परिसरातील धायरी येथील रिद्धी सिद्धी पॅराडाईज सोसायटीत पार्किंगमधील अनधिकृत बांधकामावरून मोठा वाद उफाळून आला आहे. सोसायटीच्या सेक्रेटरी अनिल दरोली यांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, सोसायटीतील एका फ्लॅटमधील रहिवाशांनी पार्किंगमध्ये पत्रे लावून फॅब्रीकेशनचे अनधिकृत काम सुरू केले होते. सोसायटीकडून नोटीस दिल्यानंतरही काम थांबवले गेले नाही. त्यामुळे १३ एप्रिल रोजी सर्व सभासदांची बैठक घेऊन बांधकाम हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
११ एप्रिल रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास हे बांधकाम काढण्यास सुरुवात झाली असता आरोपी समीर पायगुडे यांनी विरोध केला आणि सेक्रेटरी अनिल दरोली यांना लोखंडी रॉडने धमकावत, “तुम्ही आमचं ऐकत नाही, आता दाखवतोच,” असं म्हणत मारहाण केली. त्याचबरोबर आरोपी मल्लिका पायगुडे गाजरे यांनी महिलांना शिवीगाळ करत, त्यांच्या केसांना धरून मारहाण केली. यावेळी झालेल्या हाणामारीचा व्हिडीओही समोर आला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात समीर आणि मल्लिका पायगुडे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ११८(१), ३३३, ३५२, ३५१(२), ३५१(३), ३२४(२) आणि २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.