VIDEO : मतांसाठी हवं ते फ्री देणार काय?; 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचा खडा सवाल

Raj Thackeray On Ladaki Bahin Yojana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सरकारनं सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली आहे.

राज्यातील महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांना दरमहिना १५०० रुपये दिले जात आहेत. आतापर्यंत लाखो महिलांना त्याचा लाभ मिळाला आहे, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, या योजनेवर राज ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

तुम्ही लोकांना काम द्या. लोक काम मागत आहेत. ते फुकटचे पैसे मागत नाहीत. शेतकरी फुकटची वीज मागत नाही. त्यांना फक्त वीजपुरवठा खंडीत नकोय. आधी लोकांच्या मागण्या काय आहेत ते समजून घ्या. मते हवीत म्हणून हवं तसं फ्री देणार काय? मोफत म्हणजे ते कोणाचं आहे, लोकांचं आहे ना? लोकांनी टॅक्स दिलाय ना. असं करून कसं चालेल, असं राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रात असंख्य नोकऱ्या आहेत. महाराष्ट्रातील मुलं नोकऱ्या करू इच्छितात. त्यांच्यापर्यंत हे पोहोचत नाही. बाहेरच्या राज्यात कळतं की आमच्याकडे रिक्षा आणि टॅक्सी परवाने दिले जातात आणि आमच्याकडे कळत नाही. ही कुठची पद्धत आहे, असा खडा सवालही त्यांनी केला. आता हा पहिला महिना जाईल. दुसरा एखादा महिनाही जाऊ शकतो. सरकारकडे पैसे कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित करताना लाडकी बहीण योजनेच्या भविष्यातील अंमलबजावणीबाबत शंकाही उपस्थित केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com