Samruddhi Highway: समृद्धी महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर, म्हणाले...|VIDEO

Hindutva Leader Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg: इगतपुरी ते आमने या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे आज लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गाबद्दल सविस्तर माहिती दिली.

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर या टप्प्याचे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितांना संबोधित करत म्हणाले, 2014 साली आमचे सरकार आल्यावर आम्ही समृद्धी महामार्गाचे स्वप्न बघितले होते. आज त्या स्वप्नाची पूर्तता झाली आहे. समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाहीये हा महाराष्ट्राच्या समृद्धीचा इकोनॉमिक कॉरीडॉर आहे, आणि म्हणूनच या महामार्गाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. कारण या महामार्गाने महाराष्ट्राची एकात्मिता साधली आहे. महाराष्ट्राचे 24 जिल्हे हे एकमेकांना जोडले असून लवकरच हा महामार्ग आम्ही नवीन वाढवण बंदराला देखील जोडणार आहोत असे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याप्रसंगी केले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com