सरपंच संतोष देशमुख हत्येचा मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती. कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असल्याने मुंडे यांना देखील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. अशातच आज दसऱ्यानिमित्त बीड जिल्ह्यातील सावरगाव येथील भगवान गडावर मंत्री पंकजा मुंडे यांचा मेळावा सुरू असताना वाल्मिक कराडचे बॅनर झळकले. या पोस्टरवर 'We Support Walmik Anna, कराड आमचे दैवत असा मजकूर झळकत होता. कराडच्या समर्थकांनी हे पोस्टर झळकल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात वाल्मीक कराडचे पोस्टर झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.