Virar Building Collapse : विरार इमारत दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून ५ लाखांची मदत जाहीर|VIDEO

Virar Tragedy: विरार येथील रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळून 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Summary

विरारमधील रमाबाई अपार्टमेंटचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना

आतापर्यंत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू तर 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले

मुख्यमंत्री फडणवीसांकडून मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख मदतीची घोषणा

शासनाने महिनाभरापूर्वीच इमारतीला नोटीस दिल्याचे स्पष्ट

विरार येथील विजय नगर भागात घडलेल्या घटनेमध्ये आता पर्यंत 26 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून यापैकी 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मंगळवारी रात्री विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात असलेल्या रमाबाई अपार्टमेंट इमारतीचा काही भाग कोसळण्याची दुर्घटना घडली.यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रतिक्रिया देत म्हणाले, जी काही घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. शासनाने त्या इमारतीला एक महिन्यापूर्वी नोटिस दिली होती. त्या इमारतीचे स्र्टक्चरल ऑडिट करण्याचे सांगितले होते. मात्र, एका महिन्याच्या आत घर खाली करणे हे लोकांसाठी सोपे नसते. आणि आज ही घटना घडली. या घटनेमध्ये जे कोणी मृत झाले आहे त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखाची मदत करतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com