What are petrol pump safety rules? : एकीकडे पेट्रोल मिळवण्यासाठी पेट्रोल पंपावर रांगा लागल्या आहेत. अनेकजण दुचाकी अन् चारचाकी गाडीच्या टाक्या फुल करत आहेत. पण अशात एक तरुण थेट ५०० लीटरची पाण्याची टाकी घेऊनच पेट्रोल पंपावर पोहोचल्याचं समोर आले आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा व्हिडिओ उत्तर प्रदेशमधील आहे. ५०० लीटरची रिकामी टाकी खांद्यावर घेऊन आला, पण पेट्रोल भरलेली टाकी कशी घेऊन जाणार, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.
इंधन तुटवड्याच्या भीतीने पेट्रोल भरण्यासाठी तो तरूण ५०० लीटरची टाकी घेऊन पंपावर आला...मात्र पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचे सांगत टाकीत पेट्रोल देण्यास स्पष्ट नकार दिला. उत्तररप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यात हा प्रकार पहायला मिळाला. याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.