Vinod Tawde : '४० वर्षे निवडणुकीत...'; पैसे वाटप केल्याच्या आरोपावर विनोद तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाले...VIDEO

Vinod Tawde on virar : विनोद तावडे यांनी पैसे वाटप केल्याच्या आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे. हितेंद्र ठाकूर यांनी केलेले आरोप तावडे यांनी फेटाळून लावले आहेत.

विरार : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरारमध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्याकडे १० लाख रुपयांची रोकड असल्याचा आरोप केला आहे. या गंभीर आरोपानंतर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'चाळीस वर्षे निवडणुकीत कधीच पैसे वाटले नाही. पैसे वाटले असेल तर सीसीटीव्ही तपासा. चौकशी करा, असं स्पष्टीकरण विनोद तावडे यांनी दिलं आहे.

विनोद तावडे स्पष्टीकरण देताना म्हणाले, ' विरारमधून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये मतदानाच्या दिवशी आचारसंहितेचे नियम काय असतात, ते सांगायला आलो होतो. आमच्या समोरच्या मित्र पक्षाला वाटलं की, मी पैसे वाटायला आलो आहे. हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर यांच्यासोबतही चर्चा झाली. त्यामुळे पैसे वाटप होत असेल, तर पोलीस, निवडणूक आयोग, सीसीटीव्ही फुटेज सर्व आहेत. निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी यंत्रणा असते, त्याच्यावर सही कशी करायची? आक्षेप कसा घ्यायचा, या बाबी सांगितल्या'.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com