Vijay Wadettiwar Video: महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरून सत्ताधाऱ्यांना घेरणार, वडेट्टीवारांचा इशारा

Vijay Wadettiwar News Today: राज्यात आम्ही स्वाभिमानासाठी लढू...हे अधिवेशन या सरकारचं निरोपाचं असेल...

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणार असल्याचं वक्तव्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केलं आहे. महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पळवलेल्या उद्योगांमुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान महायुतीनं गहाण ठेवल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा मुद्दा अधिवेशनात गाजणार आहे. हे अधिवेशन या सरकारच्या निरोपाचं असेल. आमचे २०६ होतील, त्यांची परिस्थिती आमच्या आकड्याएवढी होईल. कितीही निधी द्या. पण कमिशन सरकार आहे. या सरकारकडून ४० टक्के कमिशन घेतलं जातंय. चंदा दो, धंदा लो असं या सरकारचं काम सुरूये, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर (State Govt.) हल्लाबोल केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com