Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संतोष चव्हाणचा जामीन फेटाळला

Vidyanand Bapat attack case Santosh Chavan bail rejected : विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी संतोष चव्हाण याला न्यायालयानं दणका दिला आहे. त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Vidyanand Bapat attack accused Santosh Chavan court order : गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाविरोधात ठाम भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या सतोष चव्हाण याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आरोपीला सोडणे समाजासाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला.

संतोष चव्हाण याला न्यायालयानं जामीन नाकारला. चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात दंगल, हाणामारी आणि घरफोडीचे एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याचा अहवाल सहायक सरकारी अभियोक्ता अमर ननावरे यांनी पुराव्यानिशी न्यायालयात सादर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com