Ajit Pawar News : अजितदादांकडून नावं ठरली; रुपाली चाकणकर, परांजपे अन् कांबळेंना विधानपरिषदेवर संधी?

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकिट मिळण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar News : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध सुरु असतानाच विधानपरिषदेच्या नावाचीही चर्चा सुरु आहे. रिक्त जागांवर लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यासाठी अजित पवार गटाकडून तीन नावे निश्चित केल्याचे समोर आले आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेसाठी तीन नावांची लवकरच शिफारस करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषदेसाठी रूपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि आनंद परांजपे यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.

यापूर्वीच अजित पवारांकडून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी विधान परिषदेच्या जागा भरण्याचे सुतोवाच करण्यात आले होते, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com