केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेसनं केला. मात्र, या आरोपांचे खंडन भाजपकडून करण्यात आले आहे. तोडूनमोडून असं वक्तव्य दाखवलं जात असून, दिशाभूल करण्याचं काम केलं जात असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काँग्रेस कमालीचा आक्रमक झाला आहे. अमित शहांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. संविधानाला त्यांनी कधीच सन्मान दिला नाही. तिरंगा झेंड्यालाही त्यांनी नाकारलं. हे संविधान आपलं नाही असे ते म्हणतात. तिरंग्याचाही तिरस्कार केला म्हणून त्यांनी आंबेडकरांबद्दल असे विधान केले, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल ते असे बोलले. बाबासाहेबांबद्दल जर एखाद्याच्या हृदयात स्थान असतं, स्वाभिमान-अभिमान असता तर त्यांनी असं वक्तव्य कधीच केले नसते. अमित शहा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. मोदीजींच्या मनात बाबासाहेब आंबेडकरांबद्दल थोडी जरी श्रद्धा असेल तर रात्री १२ वाजताच्या आत त्यांची हकालपट्टी केली पाहिजे अशी आमची मागणी आहे, असे खरगे म्हणाले.
जी व्यक्ती संविधानाची शपथ घेऊन मंत्री होते, सदस्य होते, त्या संविधानाचा अवमान करते. तर त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा काहीही अधिकार नाही. त्यांना हटवलं पाहिजे, तेव्हाच या देशाचे लोक शांत राहतील. बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे आहेत, असेही खरगे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.