VIDEO: खेडकर दांपत्याचा खरंच घटस्फोट झालाय का? सरकारचं सीआयडीला पत्र

IAS Officer Pooja Khedkar Parents Divorce: खेडकर दांपत्याचा खरंच घटस्फोट झालाय का? याचा तपास करण्यसाठी सरकारने सीआयडीला पत्र लिहून अहवाल मागितला आहे. पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.

मुंबई: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भातील बातमी आहे. पूजा खेडकर यांच्या दिवसेंदिवस अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी आईवडिलांचा घटस्फोट झाल्याचं सांगत कमी उत्पन्न दाखविल्याचा प्रयत्न केल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. त्यामुळे मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा खरंच घटस्फोट झालाय का? असा सवाल देखील आता निर्माण होत आहे. यावर आता सरकारने सीआयडीला पत्रव्यवहार करत खेडकर दांपत्याचा खरंच घटस्फोट झालाय का, याबद्दल अहवाल मागितला आहे. पूजा खेडकर यांनी नॉन क्रिमिनल सर्टिफिकीट सादर करत युपीएससीची परिक्षा दिली होती. मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्या देखील अडचणींमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com