VIDEO : भाजपला लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही; आता विधानसभेसाठी मोठा प्लान!

BJP Manthan meeting : लोकसभेत अपेक्षित यश न मिळालेल्या महाराष्ट्र भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली आहे. पुढील आठवड्यात मंथन बैठक आयोजित केली आहे.

प्रमोद जगताप | नवी दिल्ली

महाराष्ट्रात ४५ पार असा दावा करणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळू शकलं नाही. भाजप- शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला १७ जागांवर विजय मिळाला होता. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालेल्या भाजपनं आता विधानसभेसाठी मोठा प्लान केला आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळालेला भाजप या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. भाजपनं पुढील आठवड्यात मंथन बैठक आयोजित केली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे महाराष्ट्रातील २० वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या चुका टाळून विधानसभा निवडणुकीसाठी या बैठकीत रणनीती ठरवण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com