ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, VIDEO

Baba Adhav Contribution To Workers: ज्येष्ठ समाजसेवक आणि श्रमिक चळवळीचे प्रणेते बाबा आढाव यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्रमिक चळवळीचे आधारस्तंभ तसेच हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढणारे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे सोमवारी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अखरे उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्य शासनाकडून निर्देश देण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनुसार पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले. आज हमाल भवन येथे शासकीय इतामामात डॉ बाबा आढाव यांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांच्याच डोळ्यातून अश्रु तरळत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com