Myanmar Eirthquake : 'वसुधैव कुटुंबकम्', भारताकडून म्यानमारला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा

Vasudhaiva Kutumbakam: म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर भारताने तत्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. या आपत्तीमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

म्यानमारमध्ये आलेल्या विनाशकारी 7.7 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर भारताने तत्काळ मदतीचा हात पुढे केला आहे. या आपत्तीमध्ये हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून, मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे.

भारत सरकारने तातडीने मदत कार्य राबवत सुमारे 15 टन मदत साहित्य म्यानमारला पाठवले आहे. यामध्ये औषधे, तात्पुरती निवासव्यवस्था, अन्न व जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. म्यानमारच्या मदतीसाठी भारत हा पूर्ण तयार आहे असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत नेहमीच 'वसुधैव कुटुंबकम्' या तत्त्वावर विश्वास ठेवतो. संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे,आणि गरजूंना मदत करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. ही भावना पुन्हा एकदा प्रचलित झाली.

म्यानमारमधील बचाव आणि मदतकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी भारताने आवश्यकतेनुसार अधिक मदतीचे आश्वासन दिले आहे. भारताच्या या तातडीच्या मदतीचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com