Vaishnavi Hagwane: निलेश चव्हाण पुणे पोलिसांना आत्मसमर्पण करणार|VIDEO

Pune Crime Update: पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती मिळत आहे.

वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर तिच्या 9 महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा बंधुकधारी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण तो अजूनही मोकाट असून बावधन पोलीस त्याचा शोध घेत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश चव्हाण हा पोलिसांना आत्मसमर्पण करणार आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तो सध्या आरोपी आहे. वैष्णवीचे बाळ तीन दिवसांपासून निलेशकडे होते असा आरोप तिच्या आई वडिलांनी केला होता. तसेच हे बाळ मागण्यासाठी वैष्णवीचे आई वडील गेल्यावर त्यांना बंदूक दाखवून या गुंड निलेश चव्हाणने त्यांना धमकावलं होतं असाही आरोप कस्पाटे कुटुंबियाने केला होता. यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली मात्र तो अजूनही फचाड आहे. मिळालेल्या माहितीनुसार निलेश चव्हाणने पोलिसांशी संपर्क साधला आणि तो आता पोलिसांना शरण येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com