Vadhavan Port: वाढवण बंदराच्या निषेधार्थ समुद्रात ऐन भरतीमध्ये जलसमाधी आंदोलन, पाच तास पाण्यात बसले आंदोलक|VIDEO

Fishermen oppose Vadhavan port project: वाढवण बंदराच्या विरोधात स्थानिकांनी भरतीवेळी पाच तास जलसमाधी आंदोलन केलं. प्रशासनाने विश्वासात न घेता ड्रोन सर्व्हे केल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर आले.

वाढवण बंदरासाठी सुरू असलेल्या हायटाईड ड्रोन सर्व्हेच्या विरोधात सुरू असलेलं स्थानिकांच जलसमाधी आंदोलन तब्बल पाच तासानंतर स्थगित केले आहे. येत्या मंगळवारी जेएनपीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत स्थानिकांची बैठक होणार असल्याच्या प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्ते पाण्याबाहेर आले.

वाढवण समुद्रकिनाऱ्यालगत भरती चालू असताना तब्बल पाच तास स्थानिकांकडून आंदोलन करण्यात आले होते. प्रशासनाकडून स्थानिकांना विश्वासात न घेताच ड्रोन सर्व्हे केल्याने स्थानिक आक्रमक आहे. सर्व्हे करताना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे देखील प्रशासनाकडून उल्लंघन झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. तर वाढवण बंदराला विरोध कायमच राहणार असा स्थानिकांनी आक्रमक पवित्रा उचलला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com