UPI Down: UPI सर्व्हर डाऊन! लाखो यूजर्सना डिजिटल पेमेंटमध्ये अडचण|VIDEO

UPI Server Down : भारतात डिजिटल पेमेंटद्वारे व्यवहार करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे. मात्र आज पुन्हा एकदा UPI सर्व्हर डाऊन झाले असल्यामुळे नागरिकांना अडचण होत आहे.

भारतात UPI सर्व्हर शनिवारी एक वाजेच्या सुमारास डाऊन झाले आहे. शनिवारी दुपारपासून डिजिटल पेमेंटमध्ये अडचणी येत आहेत. यूपीआयमध्ये आलेल्या या अडचणीमुळे लाखो यूजर्स डिजिटल पेमेंट करू शकत नाहीयेत. अचानक झालेल्या या बिघाडामुळे Phone Pay, Google Pay आणि Paytm द्वारे देण्या घेण्याचे व्यवहार करणारे सर्वसामान्य आणि व्यापारी हैराण झाले आहे. DownDetector च्या आकड्यांनुसार दुपारपर्यंत जवळपास 1,1168 तक्रारी यूपीआय सर्व्हिस बद्दल नोंदवण्यात आल्या आहेत.

या आधी 26 मार्चला सुद्धा यूपीआय सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात टेक्निकल बिघाड झाला होता. त्यामुळे वेगवेगळ्या UPI APPS वरून जवळपास 2 ते 3 तास व्यवहार करता आले नव्हते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या समस्येच कारण टेक्निकल प्रॉब्लेम असल्याच सांगितल होत. त्यामुळे सर्वसामान्य यूजर्स आणि व्यापऱ्यांना डिजिटल पेमेंटमध्ये अडचण आली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com