Pune Rain News | पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही तासांपुर्वीच पुणे वेधशाळेने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. वेधशाळेचा हा अंदाज खरा ठरला आहे. पुण्यात गारपीट आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

पुणे :

सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही तासांपुर्वीच पुणे वेधशाळेने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता. वेधशाळेचा हा अंदाज खरा ठरला आहे. पुण्यात गारपीट आणि वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून काहीवेळ सुटका झाली आहे. पण ऐनवेळी आलेल्या पावसामुळे सामान्य नागरिकांची तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पुण्यासह कोल्हापूर, सातारा, हिंगोलीतही अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com