Top 10 Headlines @ 5 PM : गृहमंत्री अमित शाह महाकुंभमेळ्यात, एसटीच्या भाडेवाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक.. वाचा टॉप १० हेडलाइन्स

Top Headline News : एसटी भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांना माहितीच नाही, वाल्मिकच्या गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर, उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती... इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रयागराजमधल्या महाकुंभात सहभाग. त्रिवेणी संगमात स्नान करत शाहांनी केली मनोभावे पूजा.

- एसटी भाडेवाढीचा निर्णय परिवहन मंत्र्यांना माहितीच नाही, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी भाडेवाढीचा निर्णय घेतल्याची सरनाईकांची साम टीव्हीला माहिती.

- एसटी महामंडळानं केलेल्या भाडेवाढीविरोधात ठाकरे गट आक्रमक, राज्यभरात चक्काजाम आंदोलन.

- उद्धव ठाकरेंची देवेंद्र फडणवीसांसोबत छुपी रणनीती, रवी राणांचा खळबळजनक दावा.

- अल्पवयीन आरोपींचं वय १४ करण्याचा विचार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान. अमित शाहांशी चर्चा करणार असल्याची माहिती.

- वाल्मिकच्या गँगमध्ये पोलिसांनंतर आता डॉक्टर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर थोरात कराडच्या गँगमध्ये असल्याचा दमानियांचा आरोप.

- मुंबई पोलिसांनी आयुष्य उद्धवस्त केलं, नोकरी गेली अन् लग्नही मोडलं. सैफचा आरोपी म्हणून पकडलेल्या तरुणाचा दावा.

- संपूर्ण कोस्टल रोड आजपासून सेवेत, मरीन ड्राइव्हवरून वांद्रे केवळ १२ मिनिटांत गाठता येणार.

- राज्यात वाघांची संख्या वाढल्याने नसबंदीचा विचार, नसबंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती.

- तुळजडापूरातील बाभळगावात पुलाखाली ३ मृतदेह आढळल्याने खळबळ, मृतांमध्ये १ महिला आणि २ पुरुषांचे मृतदेह. घातपात की अपघात याचा पोलिसांकडून तपास सुरु.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com