Sillod News : सत्तारांना पाडण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद, पाहा VIDEO
विधानसभा निवडणुकीत भाजप - युती विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे - महाविकास आघाडी असा संघर्ष सुरू आहे. मात्र सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांमुळे भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनीच भाजपला हाक दिल्याचं दिसत आहे. निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असताना उद्धव ठाकरे यांनी थेट भारतीय जनता पार्टीलाच साद घातलीय. आपले मतभेद बाजूला ठेवू पण एकत्र येऊ असं सांगताना ही शेवटची संधी आहे असं भाजपला म्हणालेत.
गद्दाराला पाडण्यासाठी, गुंडगिरी आणि सर्वसामान्याचा छळ थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून भाजपला हाक दिलीय. राज्यात एकीकडे दररोज मोदी - शहा - फडणवीसांवर उद्धव ठाकरे हे हल्लाबोल करतायत पण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघात त्यांनी भाजपाला सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. हे भाषण सुरू असताना भाजपचे अनेक पदाधिकारी त्यांच्या व्यासपीठावर होते आणि गर्दीतही भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. विशेष म्हणजे भाजपचे अनेक पदाधिकारी उघडपणे सत्तार विरोधात प्रचार करू लागले आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांचा पराभव मीच केला असं अब्दुल सत्तार उघडपणे सांगू लागलेत, त्यामुळे भाजप संपवणाऱ्या अब्दुल सत्तार यांना आम्ही कसं मतदान करणार आणि त्यांच्या प्रचार कसा करणार असा प्रश्न भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलाय. त्यामुळे ही आयती संधी साधून उद्धव ठाकरे यांनी भाजपला साद घातली आहे. मात्र स्थानिक पातळीवर भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ऐकलं तरी राज्यातील नेते ठाकरेंना काय प्रतिसाद देतात हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Edited By Rakhi Rajput
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.