VIDEO : '.. तर त्यांच्यावर कारवाई होईल', बंडखोरांविषयी ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

MVA News : राज्यातील बंडखोर तसेच एकाच मदारसंघात आघाडीतील दोन पक्षांनी दिलेल्या उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी आज उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मैत्रीपूर्ण लढतीची आमची भूमिका नाही, असं शरद पवार यांनी म्हंटलं आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील बंडखोर तसेच एकाच मदारसंघात आघाडीतील दोन पक्षांनी दिलेल्या उमेदवारांबाबत चर्चा झाली. काही उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याचे आदेश या बैठकीतून देण्यात आले, अशी माहिती पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे, शरद पवार आणि संजय राऊत यांनी दिली आहे.

यावेळी सांगून देखील उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या उमेदवारांवर पक्ष योग्य ती कारवाई करेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हंटलं. तर कमेकांविरोधात न लढण्याची आमची भूमिका असल्याचा दावा यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. महाविकास आघाडीतील सर्व बंडखोर देखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला आनंद झाला आहे. त्यांनी उमेदवार उभे केले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता, असे म्हणत शरद पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केलं आहे. त्यांनी उमेदवार दिले असते तर भाजप विरोधातील मतदारांत फूट पडली असती. त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असून त्या निर्णयाचे मी स्वागत करत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार न देण्याची घोषणा मनोज जरांगे जरांगे पाटील यांनी केली आहे. यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिले.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com