Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Maharashtra Assembly Elections : उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. 90 हजार निवडणूक बूथवर भाजपने गुजरातची माणसं आपल्यावर नजर ठेवायला आणली असल्याचं यांनी म्हंटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. भाजपने 90 हजार बूथवर गुजरातची माणसं आणली आहेत आणि आता तीच माणसं आपल्यावर नजर ठेवत आहेत. हाच मुंबई आणि महाराष्ट्र बळकवण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

आपल्या राज्यामध्ये 90 हजार बूथ आहे आणि त्या प्रत्येक बूथसाठी देशभरातून 90 हजार लोक आले आहेत. भाजपचं काम काही साधं नाही, राज्यात काय चाललंय याचं रिपोर्ट करायला हे लोक आले आहेत, मोदी अमित शहा जेपी नड्डा यांना हे लोक रिपोर्ट करत आहेत, राज्यात कोणाची कुठे सभा पाहिजे कोणत्या सभेला किती प्रतिसाद आहे याचं रिपोर्ट हे लोक करत असल्याची प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली होती. त्यानंतर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेतून भाजपने 90 हजार बूथवर गुजरातची माणसं आणली असल्याचा गंभीर आरोप केला आहे. प्रत्येक बूथवरती भाजपच दक्षता पथक आहे. ही सगळी माणसं भाजपने गुजरातमधून आणली आहे. ही माणसं आपल्यावर नजर ठेवत आहेत. हीच माणसं आपला महाराष्ट्र आणि मुंबई बळकवणार आहेत, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com