VIDEO : मुलगी शिकली, प्रगती झाली अन् पंधराशे रुपये देऊन घरी बसवली; ठाकरेंची शिंदेंवर उपरोधक टीका

Udhav Thackarey News : लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात प्रचारसभेतून उद्धव ठाकरे यांनी मोदी – शहा यांच्यासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहांना आता महाराष्ट्राची आठवण आलीय. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र केवळ लुटण्यासाठी आहे असं वाटतं. पण आता महाराष्ट्रातील लोकांना मतदानाचा अधिकार आहे हे त्यांच्या लक्षात आलंय आहे. त्यामुळे आता ते इथे येऊन मतांचा जोगवा मागत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघात आज उद्धव ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींनी पूर्ण महाराष्ट्र लुटला आणि आता मत मागण्यासाठी ते राज्यात सगळीकडे फिरत आहेत. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पंधराशे रुपये देऊन घरी बसवली, याला महायुती सरकार प्रगती म्हणत आहे का? असं उपरोधक सवल्ही त्यांनी यावेळी केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.