उद्धव ठाकरेंना पुन्हा हादरा, आता १४ आमदार फुटणार? शिंदेंच्या आमदाराच्या दाव्याने खळबळ

Santosh Bangar : उद्धव ठाकरेंना पुन्हा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे तब्बल १४ आमदार फुटणार असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा फुटीचा फटका बसला आहे. चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदार फुटले होते. तर काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे तब्बल ६ खासदार फुटल्याचे समोर आलं आहे. मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढलेले ६ खासदार शिंदे सेनेत प्रवेश करण्याची चर्चा आहे. खासदारांनंतर आता आमदार देखील फुटणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाचे १४ आमदार फुटणार असून ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा आमदार संतोष बांगर यांनी केला आहे. संतोष बांगर यांच्या दाव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. तर पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे गटाच्या आमदार फुटणार असल्याचे संकेत दिले आहेत. आमदारांच्या फुटीचं संकेत दिल्याने उद्धव ठाकरे यांचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com