Uddhav Thackeray Wardha Speech | भाषण थांबवलं, विनंती केली, ठाकरेंच्या या कृतीने अनेकांची मने जिंकली

Uddhav Thackeray News | वर्ध्यातल्या सभेतून उद्धव ठाकरेंच्या या कृतीने अनेकांची मने जिंकली..

वर्ध्यात शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांची प्रचार सभा पार पडली. या सभेला शरद पवार, अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. या सभेत उद्धव ठाकरेंच्या कृतीने अनेकांची मनं जिंकली. वर्ध्यातल्या सभेत सर्व नेत्यांची भाषणं झाली. उमेदवार अमर काळे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांचे भाषण होणार होतं. पण खूप उशीर झाला. काळे यांच्या सहकाऱ्यांनी काळे यांना भाषण आटपायला सांगितलं आणि उद्धव ठाकरे यांना भाषण करण्याची विनंती केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी भर मंचावरुन अमर काळे यांचं कौतूक करुन माझ्यानंतर अमर काळे यांचं भाषण पूर्ण ऐकायचं लोकांकडून आश्वासन घेतलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com