Maharashtra : शिंदेसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी फाडला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो; ठाकरेसेना संतप्त

Maharashtra News : शिंदेसेनेच्या पत्रकार परिषदेत शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने वाद निर्माण झाला. यानंतर ठाकरेसेनेने शिवसेनाभवनाबाहेर आंदोलन केले.

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी नुकतंच त्यांचं ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह’ या आत्मचरित्राचं प्रकाशन केलं. या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला असल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे होते. याचा निषेध करण्यासाठी काल शिंदेसेनेने पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपस्थित शिंदेसेनेच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांचं पुस्तक फाडून निषेध नोंदवला.

मात्र याच घाईगडबडीत शिंदेसनेच्या नेत्या शायना एनसी यांनी भर पत्रकार परिषदेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला. माध्यमांनी ही बातमी लावून धरल्यानंतर आज सकाळी शायना एनसी यांनी माफी मागितली. मात्र बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्यामुळे अनेक शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे नागरिकांनी आक्रमक होत शिवसेना भवनाबाहेर आंदोलन केले. यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.