Uddhav Thackeray : हृदयात ब्लॉकेज, उद्धव ठाकरेंवर तातडीने अँजिओप्लास्टी

Uddhav Thackeray Angioplasty : ठाकरे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं समोर आलेय. सध्या ठाकरेंची प्रकृती स्थिर आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. दोन दिवसांपासून ठाकरेंना त्रास जाणवत होता, त्यामुळे तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचं समोर आले. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं समोर आलेय. सध्या ठाकरेंची प्रकृती स्थिर आहे.

मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करणयात आली. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सकाळी आठ वाजताच्या आसपास ते रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. त्यामध्ये ब्लॉकेज असल्याचं लक्षात आले. डॉक्टरांच्या सल्लानुसार आज दुपारी १२ वाजता अँजिओप्लास्टी करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com