Uddhav Thackeray: दिवाळीपूर्वी 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाका; उद्धव ठाकरेंचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान|VIDEO

Demands ₹1 Lakh Deposit For Farmers Before Diwali: संभाजीनगरमध्ये झालेल्या हल्लाबोल मोर्चादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करा, असे थेट आव्हान ठाकरे यांनी दिले.

संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज हंबरडा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना घेऊन उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. उद्धव ठाकरे म्हणाले, मी या पॅकेजचे समर्थन करायला तयार आहे. पण माझी एक अट आहे. मुख्यमंत्री बोललेत खरडून गेलेल्या जमिनीला पर हेक्टरी मनरेगातून साडेतीन लाख रुपये देणार आहोत. मग मी मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो की, तुमची नियत असेल तर दिवाळीआधी तीन लाखातील एक लाख रुपये माझ्या शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करा, असे आव्हान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com