Uday Samant News : उदय सामंत यांनी भाजप आमदार गणेश नाईकांना ताटकळत ठेवलं?

मंत्री उदय सामंत यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांना ताटकळत ठेवलं. सामंतांनी नाईकांना अडीच तास ताटकळत ठेवल्याचे सांगितले जात आहे.

गणेश नाईक हे उदय सामंत यांच्याकडे बैठकीसाठी गेले होते. तेव्हा सामंत यांनी नाईकांना अडीच तास ताटकळत ठेवले होते. गणेश नाईक यांनी विधानभेत आरोप केले होते. त्यासाठी सामंत यांनी नाईक यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. पण सामंत वेळेत पोहोचलेच नाहीत, आणि काम झाल्यावर परस्पर निघून गेले अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. गणेश नाईक यांना अडीच ताटकळत बसावे लागल्याने ते खुप संतापले होते असे सांगितले जात आहे. सरकारमध्ये आणि प्रशासनात बिल्डरचे दलाल बसले आहेत असा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी विधानसभेत केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com