Tuljapur Temple News | 8 कोटी 46 लाख रुपये, तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी अपहार प्रकरण
आई तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट तुळजापूर येथील दानपेटीच्या सुमारे ८ कोटी ४६ लाख रूपयांच्या अपहार प्रकरणी दोन अहवालाच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने तपास करण्याचे आदेश संभाजीनगर हायकोर्टाचे न्या. मंगेश पाटील व न्या. शैलेश ब्रह्मे यांनी ९ मे २०२४ रोजी दिले होते. तुळजापूर श्री. तुळजाभवानी मातेच्या दानपेटीत भक्तांनी वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत दान दिले. यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. अपहार झाल्याची बाब धाराशिवच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशीचे निर्देश दिले होते. त्यानंतर राज्य गुन्हा अन्वेषन विभागातर्फे १७ नोव्हेंबर २०१७ चौकशी करून अहवाल सादर करण्यात आला होता. या आहवालात ८ कोटी ४६ लाख रूपयांचा अपहार झाल्याचे नोंद होते. म्हणून राज्याच्या पोलिस महासंचालकांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.