Nandurbar News : लाडक्या बहीणींचा बँकेबाहेर मुक्काम; Video

ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेच्या ई - केवायसीसाठी बँकेत महिलांनी मोठी गर्दी केली आहे. यातील आदिवासी महिलांवर बँकेबाहेरच रात्री मुक्काम करण्याची वेळ आली आहे.

लाडकी बहीण योजनेच्या ई - केवायसीसाठी नंदुरबार जिल्ह्यात महिलांनी मोठी गर्दी केली आहे. यातील आदिवासी महिलांवर बँकेबाहेरच रात्री मुक्काम करण्याची वेळ आली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना काढली आहे. या योजनेसाठी बँकेत ई - केवायसी करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता लाडक्या बहीणींची बँकांच्या बाहेर गर्दी बघायला मिळत आहे. यातच नंदुरबार जिल्ह्यात देखील महिलांनी लाडकी बहिण योजनेच्या ई केवायसीसाठी गर्दी केली आहे. यातल्या काही आदिवासी महिलांना या ई केवायसीसाठी ग्रामीण भागातून येणंजाणं परवडत नसल्याने या महिलांना रात्री बँकेच्या बाहेरच मुक्काम करावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबारमधून समोर आला आहे. रात्रभर या महिला बँकेच्या बाहेरच आपल्या नातेवाईकांसोबत बसून असलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे यावर काही ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी या महिलांकडून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com