Chhaava Movie Burhanpur News : औरंगजेबची तिजोरी म्हटल्या जाणाऱ्या बुरहानपूरमध्ये लोक खजिना शोधत आहेत. छावा पाहिल्यानंतर बुरहानपूरमध्ये रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने लोक खजिना शोधत आहेत. छावा चित्रपट पाहिल्यानंतर बुरहानपूरमधील (Burhanpur Gold Coin Searching) असीरगड येथे नागरिकांनी १०० खड्डे खोदले आहेत. मुगलांचा खजिना शोधण्यासाठी लोकांनी खड्डे खोदले आहेत. (Burhanpur Treasure Hunt)
विकी कौशल याच्या छावाने देशाला वेड लावलेय. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दररोज नवनवे विक्रम करत आहेत. छावा पाहिल्यानंतर मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये खजिना शोधला जातोय. रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या मदतीने खजिना शोधला जात असल्याचे समोर आलेय. या ठिकाणी १०० पेक्षा जास्त खड्डे खोदण्यात आले आहेत. प्रशासनाला याबाबत समजताच अधिकारी दाखल झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.