Video: पोलिस स्टेशनवर दगडफेक! जळगावटच्या जामनेल पोलिस स्थानकाबाहेर काय घडलं? CCTV समोर

Jalgaon News: पोलिस स्टेशनवर करण्यात आलेल्या दगडफेकीचं सीसीटीव्ही फुटेज समोर, जळगावच्या जामनेरमधील धक्कादायक घटना, पाहा व्हिडीओ

जळगाव : पोलिस स्टेशनवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलंय. जळगावच्या जामनेर पोलीस स्टेशनवर जमावाकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेमध्ये जमावातील काही तरुण हे पोलीस स्टेशनवर तुफान दगडफेक करत असल्याच दिसून आलंय. तर पोलिस दगडफेकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गेटच्या बाजूने लपले होते. सहा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या आरोपीला ताब्यात द्या, अशी मागणी करत जमाव आक्रमक झला होता. आरोपीला आम्हाला शिक्षा करायची आहे, असं म्हणणाऱ्या जमावाने थेट पोलिस स्टेशनवरच दगडफेक केली, अशी माहिती समोर आली आहे. या जमावाकडून आधी रास्तारोको करण्यात आला होता. आंदोलन सुरु असतानाच अचानक वातावरण तापलं. दरम्यान, संतप्त जमावाकडून पोलीस स्टेशनवर दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली. या घटने प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 15 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com