महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईत शिवतीर्थावर भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यंदा या मेळाव्यासाठी नाशिकमधून विशेष तयारी करण्यात आली असून, सुमारे सात ते आठ हजार कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसे नेते दिनकर पाटील यांनी दिली आहे.
नाशिकमधील मनसे कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत असून, ७०० ते ८०० वाहनांचा ताफा घेऊन कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. एकेकाळी नाशिक हे मनसेचा बालेकिल्ला मानले जात होते. दोन वेळा नाशिक महापालिकेवर मनसेने आपला झेंडा फडकवला होता.
मात्र, विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये दोन सभा घेतल्या तरीही पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही. आता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आणि आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नेमके काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.