Hingoli Farmer VIDEO: शेतीची मशागत करण्यासाठी लहान भावाला औताला जुंपले, बैल मिळाले नसल्याने हतबल

Hingoli Farmer News: लहान भावाला औताला जुंपून केली शेती, शेती करण्यासाठी बैल परवडत नाही म्हणून शेतकरी हतबल

हिंगोली: शेतीची मशागत करण्यासाठी लहान भावाला अवताला जुंपण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील सिरळी गावात हा प्रकार घडला आहे. शेतात हळदीच्या पिकाची मशागत करण्यासाठी बैल मिळत नसल्याने एका अल्पभूधारक शेतकऱ्याने लहान भावाला औताला जुंपले असल्याची माहिती समोर येत आहे. बालाजी पुंडगे असे या शेतकऱ्याचे नाव असून पुंडगे यांच्याकडे दीड एकर शेती आहे, शेतीसाठी बैल घेणे परवडत नाहीत म्हणूम पुंडगे यांनी बैल खरेदी केले नव्हते त्यातच ऐनवेळी मशागतीला बैल मिळत नसल्याने त्यांनी स्वतःच्या भावाला औताला जुंपण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com