Thane Traffic Jam News | मेगाब्लॉकमुळे ठाणेकरांनी काढल्या गाड्या, मोठी वाहतूक कोंडी

मेगाब्लॉकमुळे ठाण्यातून अनेक कर्मचाऱ्यांनी गाडीने ऑफिस गाठायला सुरूवात केली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर (Chhatrapati Shivaji Mahraj Terminus) दोन फलाटांचे रुंदीकरण सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवर ६३ तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. ठाण्याहून लोकल नसल्याने चाकरमान्यांनी आपल्या खासगी वाहनांनी ऑफिस गाठायला सुरूवात केली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरच्या कर्मचाऱ्यांनी आज घरीच राहणे पंसत केले आहे. पण ठाणेकरांनी ऑफिस गाठायला सुरूवात केली आहे. त्यामुळे ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने वाहतुक कोंडी झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com